Akshata Chhatre
थंडीच्या दिवसांत पेरू खाण्याचे भरपूर फायदे आहेत. व्हिटॅमिन सीने युक्त असलेला पेरू खाल्ल्याने रोगांसोबत दोन हात करता येतात.
पेरू आणि पचनक्रिया यांचा खूप जवळचा संबंध आहे. पेरू खाल्याने पचनक्रिया सुधारते.
पेरू खाल्याने शरीरातील साखरेचं प्रमाण आटोक्यात राहायला मदत मिळते.
थंडीच्या दिवसांत त्वचा बरीच कोरडी पडते आणि पेरूमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए आणि सीमुळे त्वचा टवटवीत राहायला मदत मिळते.
तुम्हाला जर का सर्दी, खोकला यांसारखे त्रास सतावत असतील तर नक्कीच पेरू गुणकारी ठरू शकतो.
पेरू हृदयाला सुरक्षित ठेवतो आणि माणसाचं आयुष्य सुधारतं.