Pramod Yadav
गोव्यातील विविध चर्चमध्ये येशू जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
पणजीमधील मेरी इमॅक्युलेट चर्चमध्ये येशू जन्मोत्सव साजरा झाला.
नाताळनिमित्त चर्च परिसरात आकर्षक रंगरंगोटी, रोषणाई सारखी जय्यत तयारी करण्यात आली होती.
चर्चच्या समोर भेटवस्तूंना रंगरंगोटी आणि रोषणाई करण्यात आली असून, आकर्षक दिसत आहेत.
चर्चच्या पायथ्याशी आकर्षक गोठा तयार करण्यात आला असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रात्री बारानंतर येशू जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देशी विदेशी पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळाली.
चर्चच्या समोर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पणजीतील चर्च ऑफ अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन गोव्यातील सर्वात जुने चर्च आहे.
गोव्यात नाताळनिमित्त सर्व ठिकाणी उत्साह आणि अनेक चर्च परिसरात आकर्षक रोषणाई पाहायला मिळत आहे.