Sameer Panditrao
उत्तराखंडमध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. पण या गर्दीत ‘चौकोड़ी’ हे एक लपलेलं रत्न आहे.
चौकोड़ी हे पिथौरागढ जिल्ह्यातील एक छोटं, पण निसर्गरम्य हिल स्टेशन आहे.
बांज, चीड़, बुरांश, ओक आणि देवदार यांसारख्या झाडांनी वेढलेली चौकोड़ीची जंगलं पर्यटकांना मनमुराद निसर्गसंपदा अनुभवायला देतात.
चौकोड़ीमधील फळबागा आणि चहा बागा फिरणे हा अनोखा अनुभव आहे.
चौकोड़ीहून पंचाचूली, नंदाकोट, त्रिशूल, थरकोट, मैकतोली आणि नंदादेवीच्या शिखरांचं नयनरम्य दृश्य अगदी जवळून दिसतं.
चौकोड़ी हे जगातील सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी उत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
चौकोड़ीच्या रात्री निरभ्र आकाशात लाखो तारे आणि आकाशगंगा आपल्या डोळ्यांसमोर दिसणे हा अद्भुत प्रकार आहे.