Manish Jadhav
चिवला बीच हा आकाराने अर्धवर्तुळाकार (C-Shape) असून तो मालवण शहराच्या अगदी जवळ आहे. इथली पांढरी शुभ्र वाळू आणि निळेभोर पाणी पर्यटकांना भुरळ घालते.
मालवणमधील इतर किनाऱ्यांच्या तुलनेत चिवला बीच खूपच शांत आणि स्वच्छ आहे. ज्यांना गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवायचा आहे, त्यांच्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
येथे स्कुबा डायव्हिंग (Scuba Diving), पॅरासेलिंग आणि बनाना राईड यांसारख्या विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. येथील पाणी संथ असल्याने पोहण्यासाठीही सुरक्षित मानले जाते.
चिवला बीचवरुन दिसणारा सूर्यास्त अतिशय मनमोहक असतो. संध्याकाळच्या वेळी आकाशात उमटणारे विविध रंग आणि समुद्राच्या लाटांचा आवाज मनाला उभारी देतो.
किनाऱ्यालगत अनेक होमस्टे आणि हॉटेल्स आहेत, जिथे तुम्ही अस्सल मालवणी पद्धतीचे मासे, सोलकढी आणि घावणे-चटणीचा आस्वाद घेऊ शकता.
चिवला बीचपासून ऐतिहासिक 'सिंधुदुर्ग किल्ला' आणि 'रॉक गार्डन' अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे मालवण भ्रमंती करताना या बीचला भेट देणे सोयीचे ठरते.
येथील स्वच्छ वाळू, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या मासेमारी नौका आणि नारळ-पोफळीच्या बागा फोटोग्राफीसाठी उत्तम बॅकड्रॉप देतात.