Chittorgarh Fort: 16000 राजपूत महिलांचा 'जौहर', जिथं मृत्यू पत्करला पण गुलामगिरी स्वीकारली नाही; वाचा 'चित्तोडगड'च्या शौर्याचा इतिहास

Manish Jadhav

चित्तोडगड किल्ला

राजस्थानातील चित्तोडगड हा किल्ला केवळ एक वास्तू नसून भारतीय शौर्य, त्याग आणि बलिदानाचे जिवंत प्रतीक आहे. हा किल्ला सुमारे 700 एकर परिसरात पसरलेला असून याला 'किल्ल्यांचा सिरमोर' (किल्ल्यांचा राजा) म्हटले जाते. डोंगरावर वसलेला हा अवाढव्य किल्ला लांबून एखाद्या मोठ्या जहाजासारखा दिसतो.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

विजय स्तंभ

महाराणा कुंभा यांनी माळवा आणि गुजरातच्या सुलतानांवर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ हा 122 फूट उंच स्तंभ उभारला होता. यावर हिंदू देवी-देवतांचे अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

राणी पद्मिनीचे शौर्य आणि 'जौहर'

अल्लाउद्दीन खिलजीने किल्ल्याला वेढा घातला तेव्हा आपला आत्मसन्मान राखण्यासाठी राणी पद्मिनी यांनी 16000 राजपूत महिलांसह अग्नीमध्ये उडी घेऊन 'जौहर' (आत्मबलिदान) केला होता. ही जागा आजही पर्यटकांच्या अंगावर शहारे आणते.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

मीराबाईंचे भक्तिस्थान

याच किल्ल्यात प्रसिद्ध कृष्णभक्त संत मीराबाईंचे मंदिर आहे. मीराबाईंनी आपला राजवाडा सोडून याच मंदिरात बसून श्रीकृष्णाची अनेक भजने रचली होती.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

वाळवंटातील पाण्याचा खजिना!

चित्तोडगड हा डोंगरदरीत असूनही येथे पाण्याचे मोठे नियोजन होते. एकेकाळी येथे 84 तलाव आणि विहिरी होत्या, ज्यामुळे 50,000 सैनिकांना 4 वर्षे पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असायचा. आजही येथे 'गौमुख कुंड' प्रसिद्ध आहे.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

7 विशाल दरवाजे

किल्ल्यात जाण्यासाठी राम पोल, लक्ष्मण पोल आणि हनुमान पोल यांसारखे 7 विशाल दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजाचा स्वतःचा इतिहास आणि युद्धाच्या कथा आहेत.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

महाराणा प्रताप यांचे शौर्य

हा किल्ला मेवाड राजघराण्याची राजधानी होता. मुघल सम्राट अकबरासोबत झालेला संघर्ष आणि महाराणा प्रताप यांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा या किल्ल्याच्या मातीशी जोडलेला आहे.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

Mehrangarh Fort: महाकाय तोफा, युद्धाच्या खुणा अन् शत्रूला घाम फोडणारी तटबंदी; सोन्या-चांदीच्या कलाविष्कारानं सजलेला 'मेहरानगड'

आणखी बघा