Manish Jadhav
चित्तोडगड हा भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा किल्ला असून तो तब्बल 700 एकर परिसरात पसरलेला आहे.
या ऐतिहासिक किल्ल्याची निर्मिती 7व्या शतकात मौर्य वंशातील शासक 'चित्रांगद मौर्य' यांनी केली होती.
अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणावेळी स्वतःचा सन्मान राखण्यासाठी राणी पद्मिनीने 16,000 स्त्रियांसह जिवंत अग्निकुंडात उडी घेतली होती.
या किल्ल्याच्या रक्तरंजित इतिहासात राजपूत स्त्रियांच्या पराक्रमाचे आणि बलिदानाचे तब्बल 3 मोठे 'जौहर' झाले आहेत.
माळवा आणि गुजरातच्या सुलतानांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ राणा कुंभा यांनी हा नऊ मजली स्तंभ बांधला.
इतिहासकाळात या किल्ल्यावर 84 पाण्याचे साठे होते, जे शत्रूच्या वेढ्यातही 40000 सैनिकांची पाण्याची गरज सहज भागवत.
कृष्णभक्त संत मीराबाई याच किल्ल्याच्या राजघराण्याची सून होत्या, जिथे त्यांनी अनेक अजरामर भजनांची निर्मिती केली.