नागमोडी वळणांचा भूलभुलैय्या अन् भारतातील सर्वात मजबूत 'दगडांचा किल्ला'; चित्रदुर्ग सांगतो हैदर अलीच्या सैन्याविरुद्ध लढणाऱ्या धाडसी महिलेची शौर्यगाथा

Manish Jadhav

दगडांचे अद्भूत जाळे

चित्रदुर्ग किल्ल्याला 'कल्लीना कोटे' म्हणजेच दगडांचा किल्ला म्हटले जाते. हा भारतामधील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक असून, तो ग्रॅनाइटच्या अवाढव्य खडकांचा वापर करुन अत्यंत कल्पकतेने बांधला गेला.

Chitradurga Fort | Dainik Gomantak

'सात तटबंदीचा' अभेद्य वेढा

या किल्ल्याची रचना 'एळुसुत्तू कोटे' म्हणजेच सात वर्तुळाकार तटबंदींमध्ये विभागलेली आहे. शत्रूला मुख्य भागात पोहोचणे अशक्य व्हावे, अशा प्रकारे याच्या चक्रव्यूहासारख्या भिंती आणि गुप्त मार्ग तयार करण्यात आले होते.

Chitradurga Fort | Dainik Gomantak

'किंडी'चा थरार

किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात थरारक भाग म्हणजे 'ओनाके ओबव्वा' हिचे शौर्य! हैदर अलीचे सैनिक एका अरुंद गुप्त खिंडीतून (किंडी) किल्ल्यात घुसत असताना, ओबव्वाने एकटीने मुसळाने प्रहार करुन अनेक शत्रू सैनिकांना कंठस्नान घातले होते.

Chitradurga Fort | Dainik Gomantak

38 गुप्त दरवाजे

किल्ल्यात 38 गुप्त दरवाजे, 4 मुख्य दरवाजे आणि पाण्याच्या साठवणुकीसाठी अनेक विहिरी व तलाव आहेत. पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये आणि वेढा पडल्यास वर्षानुवर्षे पाणी पुरावे, असे अद्भूत रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञान येथे पाहायला मिळते.

Chitradurga Fort | Dainik Gomantak

मदकरी नायकांचा पराक्रम

विजयनगर साम्राज्यानंतर चित्रदुर्गवर 'पालयेगार' म्हणजेच मदकरी नायक घराण्याचे राज्य होते. या घराण्यातील 'राजा वीर मदकरी नायक' हे अत्यंत शूर राजे होते, ज्यांनी हैदर अलीच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध निकराचा लढा दिला.

Chitradurga Fort | Dainik Gomantak

हिडिंबासूर वध

या किल्ल्याला महाभारताचाही संदर्भ आहे. असे मानले जाते की, याच परिसरातील टेकड्यांवर भीम आणि हिडिंबासूर यांच्यात युद्ध झाले होते. किल्ल्याच्या आवारात असलेले प्राचीन हिडिंबेश्वर मंदिर याची साक्ष देते.

Chitradurga Fort | Dainik Gomantak

भूलभुलैय्यासारखे प्रवेशद्वार

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार सरळ रेषेत नसून नागमोडी वळणांचे आहे. शत्रूच्या हत्तींना वेगाने येऊन दरवाजावर धडक देता येऊ नये, म्हणून ही हुशार रणनीती वापरण्यात आली होती.

Chitradurga Fort | Dainik Gomantak

Bidar Fort: पर्शियन वास्तुकलेचा अद्भूत अविष्कार, शत्रूसाठी मृत्यूचा सापळा; वाचा बीदर किल्ल्याच्या वैभवाची आणि संघर्षाची कहाणी

आणखी बघा