Sameer Panditrao
चिंचोणे शेतकरी क्लबने गोव्याच्या पारंपरिक ‘जीरा तांदूळ’ लागवडीच्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ हल्लीच केला.
यंदा क्लबने १०० हेक्टर शेतजमिनीत भाताची लागवड करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
जीरा तांदूळ लागवड सुरुवातीस थोड्या प्रमाणात केली जाईल.
एका हेक्टरमध्ये पाच टन जीरा तांदळाचे उत्पादन होऊ शकते.
या तांदळाचा भात लवकर शिजतो.
शेतकऱ्यांमध्ये भातलागवडीची जागृती होताना दिसत आहे.
जीरा तांदूळ यांच्याबरोबर राजमाची लागवडही सुरू केली आहे.