Human Metapneumovirus: 2025 ठरणार चिंतेचं? कोरोनानंतर नव्या व्हायरसची दस्तक

Manish Jadhav

कोरोना व्हायरस

5 वर्षांपूर्वी चीनमधून प्रसारित झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार उडवून दिला होता. आता पुन्हा एकदा चीनमध्ये एक नव्या विषाणूने दस्तक दिली आहे.

Human Metapneumovirus | Dainik Gomantak

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस

चिंतेची बाब म्हणजे या विषाणूची बहुतांश लक्षणे कोरोना सारखीच आहेत. 'ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस' असे या खतरनाक विषाणूचे नाव आहे.

Human Metapneumovirus | Dainik Gomantak

लक्षणे कोरोनासारखीच

या विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये खोकला, सर्दी आणि श्वास घेण्यात अडचण अशी लक्षणे दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा लोकांमध्ये चिंता वाढली आहे.

Human Metapneumovirus | Dainik Gomantak

दोन वर्षांखालील मुलांना धोका

चीन सीडीसीचे म्हणणे आहे की, ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. या विषाणूची अधिक प्रकरणे दोन वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आली आहेत. ज्या लोकांना आधीच श्वसनाचे कोणतेही आजार आहेत त्यांना जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे.

Human Metapneumovirus | Dainik Gomantak

संसर्गजन्य रोग

हा विषाणू संसर्गजन्य असल्याने चीनी सरकार सतर्क झाले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्याही सुरु करण्यात आल्या आहेत.

Human Metapneumovirus | Dainik Gomantak

औषध उपलब्ध नाही

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसवर उपचार करणारी अद्याप कोणतीही अँटीव्हायरल औषधे नाहीत. बहुतेक लोकांवर केवळ लक्षणांच्या आधारे उपचार केले जात आहेत.

Human Metapneumovirus | Dainik Gomantak
आणखी बघा