Sameer Panditrao
अतिवेगवान रेल्वे हे चीनचे वैशिष्ट आहे. तेथे बुलेट ट्रेनच्या वेगाचा नवा विक्रम लवकरच प्रस्थापित होणार आहे.
यासाठी ‘सीआर४५०’ ही बुलेट ट्रेन रुळांवर येणार आहे. तिचा सर्वाधिक वेग ४५० किलोमीटर प्रतितास असून ती जगातील प्रचंड वेगाने धावणारी रेल्वे आहे.
‘सीआर४५०’ या रेल्वेने २१ ऑक्टोबर रोजी शांघाय-चोंगकिंग-चेंगडू या हायस्पीड रेल्वे मार्गावर ताशी ४५० किलोमीटरचा वेग गाठला.
ती जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन ठरली आहे. यामुळे चीनमधील प्रवास आणखी वेगवान, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम होणार आहे.
चीनने या नव्या बुलेट ट्रेनचे प्रारुप नोव्हेंबर २०२४ सादर केले होते.
एक हजार किमीपेक्षा जास्त अंतर कापण्यास अर्ध्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे.
‘मेड इन चायना’ वरून ‘क्रिएटेड इन चायना’कडे झालेल्या परिवर्तनाचे हे द्योतक मानले जाते