Sameer Panditrao
सर्वाधिक थंडीचा ४० दिवसांचा ‘चिलाई-कलान’ हंगाम सुरू होत असतानाच काश्मीर खोऱ्यातील उंचीवरील भागांत हिमवृष्टी झाली.
दीर्घकाळाच्या कोरड्या हवामानानंतर लोकांना दिलासा मिळाला.
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमर्ग येथे जवळपास दोन इंच बर्फ पडल्याची नोंद झाली.
श्रीनगर-कारगील महामार्गावर असलेल्या सोनमर्ग या पर्यटन स्थळी रविवारी सकाळी हिमवृष्टीला सुरुवात झाली.
श्रीनगर-कारगील महामार्गावर असलेल्या सोनमर्ग या पर्यटन स्थळी रविवारी सकाळी हिमवृष्टीला सुरुवात झाली.
श्रीनगरसह खोऱ्यात रात्रभर अधूनमधून हलका पाऊस पडला. या पावसामुळे काश्मीरमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेला कोरड्या हवामानाचा काळही संपला.
सर्वाधिक थंडीच्या ‘चिलाई-कलान’ या हंगामाच्या पहिल्याच दिवशी हिमवृष्टी व पाऊस होणे हा स्थानिक पातळीवर पुढील काळात भरपूर हिमवृष्टी होण्याचा संकेत मानला जातो.