Pramod Yadav
गेल्या चार दशकात प्रथमच प्रचंड प्रमाणात वरूणराजाही बरसला, त्यामुळे यंदाचा चिखलकाला -गोपालकाला अविस्मरणीय ठरला.
माशेल पंचक्रोशीत श्री देवकीकृष्ण मैदानावर आबालवृद्ध गोविंदा चिखलाने माखल्याने एकमेकांना ओळखणेही कठीण झाले.
हरिनामाचा जयघोष करीत देवतांना नमन केल्यानंतर ‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल’ अशा गजरात नाचत चिखलकाल्याला आबालवृद्धांनी सुरुवात केली.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे दुसऱ्यांदा चिखलकाल्यात सहभागी झाले आणि शेवटपर्यंत विविध खेळातही त्यांनी सहभाग दर्शविला.
चिखलकाल्याला खूप जुनी परंपरा असून तो नेमका कधी सुरू झाला याची लिखित माहिती उपलब्ध नसला तरी किमान तीन-चार शतकांचा इतिहास या उत्सवाला असावा.
या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरुप असून लोकगीते पारंपरिक खेळ, नाच गाणी अशा विविध प्रकारांचा त्यात समावेश आहे.
श्रीकृष्णाच्या बालक्रीडांशी निगडीत असा हा उत्सव असून आजही त्याचे स्वरूप बदललेले नाही.