Vishalgad Fort: तोफांचा आवाज अन् बाजीप्रभूंचा देहदान; विशालगडाच्या तटबंदीत दडलंय पावनखिंडीचं शौर्य!

Manish Jadhav

स्वराज्यातील 'विशाल' दुर्ग

कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेला 'विशालगड' हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

'खेळणा' ते 'विशालगड'

या किल्ल्याचे मूळ नाव 'खेळणा' होते. 1659 मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला आणि याचे नाव बदलून 'विशालगड' (महारष्ट्रातील विशाल दुर्ग) असे ठेवले.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

पन्हाळ्याचा वेढा आणि सुटका

जुलै 1660 मध्ये सिद्धी जोहरच्या पन्हाळगडच्या वेढ्यातून निसटल्यानंतर महाराज याच विशालगडाकडे मदतीसाठी निघाले होते.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

बाजीप्रभूंची अभूतपूर्व स्वामीनिष्ठा

महाराज विशालगडावर सुरक्षित पोहोचेपर्यंत खिंड लढवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांनी घेतली. त्यांच्या शौर्याने 'घोडखिंड' ही 'पावनखिंड' बनली.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

तोफांच्या आवाजाची प्रतीक्षा

बाजीप्रभूंनी महाराजांना शब्द दिला होता की जोपर्यंत गडावरुन तोफांचे आवाज येत नाहीत, तोपर्यंत ते खिंड लढवतील. तोफांचा आवाज ऐकूनच त्यांनी आपले प्राण सोडले.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

महाराजांचे सुरक्षित आगमन

विशालगडालाही शत्रूचा वेढा होताच, पण महाराजांनी तो वेढा मोडून काढला आणि गडावर सुरक्षित पोहोचून तोफा डागल्या.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

शिवरायांचे प्रेम आणि सन्मान

विशालगडावर पोहोचल्यावर महाराजांना बाजीप्रभूंच्या बलिदानाची माहिती मिळाली. त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या या एकनिष्ठ मावळ्याला श्रद्धांजली वाहिली.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

आजही प्रेरणा देणारा गड

विशालगड हा केवळ एक किल्ला नसून तो शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचा आणि मावळ्यांच्या पराक्रमाचा जिवंत इतिहास आहे, जो आजही लाखो शिवप्रेमींना प्रेरणा देतो.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

आणखी बघा