Sameer Panditrao
नाशिक जिल्हयात अनेक दुर्ग आहेत त्यापैकी एका महत्वाच्या गडाची आपण माहिती घेऊ.
आज आपण माहिती घेऊ कांचनगडाची
सातमाळा रांगेत हा दुर्ग आपल्याला पाहायला मिळतो.
किल्ल्याच्या परिसरात खिंड, एक गुहा, काही पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात.
या किल्ल्यासंदर्भात एक ऐतिहासिक गोष्टही आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनवेळा सुरत लुटल्यावर या किल्ल्याजवळ दाऊदखान त्यांना आडवा आला होता.
या दोन्हीवेळा लढाईत मराठा सैन्याने मोगलांचा सपाटून पराभव केला होता. खुद्द महाराज या लढाईत आघाडीवर होते ही विशेष आठवण.