भारत-पाक सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा

गोमंतक ऑनलाईन टीम

कुपवाडा येथे पुतळा

जम्मू काश्मिरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे.

Chhatrapati Shiavaji Maharaj Statue at Kupwara | google image

अनावरण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण झाले.

CM Eknath Shinde | google image

जवानांसोबत फराळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जवानांसोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतला.

sudhir mungantiwar | google image

आम्ही पुणेकर

आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकाराने हा पुतळा उभारण्यात आला आहे.

Chhatrapati Shiavaji Maharaj Statue at Kupwara | google image

पुतळ्याविषयी...

भारतीय सैन्याच्या छावणीत उभारलेला हा पुतळा साडेदहा फुट उंचीचा आहे. तो जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि 7 x 3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारला आहे.

Chhatrapati Shiavaji Maharaj Statue at Kupwara | google image

पाकिस्तानच्या दिशेने मुख

जम्मू-काश्मिरमधील हवामानत तग धरू शकेल, असा हा पुतळा आहे. पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावला आहे. शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने आहे.

Jammu and Kashmir | google image

भूमीपूजन

भूमीपुजनादिवशी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणली होती.

Chhatrapati Shiavaji Maharaj Statue at Kupwara | google image
Goan Fish Curry | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...