Sameer Amunekar
शिवाजी महाराजांच्या काळात पगार "होन" या सोन्याच्या नाण्यात दिला जायचा. एका होनाचं सध्याच्या काळातलं मूल्य अंदाजे ६,२०० रुपये इतकं आहे.
महाराज नेहमी आपल्या सैन्याचा पगार वेळेवर द्यायचे. एखादी मोहिम असल्यास ४ महिन्यांचा अगाऊ पगार दिला जात असे, जेणेकरून सैनिकांच्या कुटुंबाचे हाल होऊ नयेत.
हवालदारास वार्षिक १२५ होन म्हणजे आजच्या काळात सुमारे ₹७.७५ लाख इतका पगार मिळायचा. म्हणजेच महिन्याला अंदाजे ₹६४,५८३ इतका पगार होता.
मुख्य प्रधान: १५,००० होन वार्षिक, आमत्य: १२,००० होन, चिटणीस: ६,००० होन, फडणीस: २,००० होन, सुभेदार: ४०० होन आणि पालखीचा मान, मुजूमदार: १०० ते १२५ होन वार्षिक.
सरनोबत: ५,००० होन, पंचहजारी सरदार: २,००० होन, एकहजारी सरदार: १,००० होन, हवालदार: १२५ होन, बारगीर: ९ होन वार्षिक
सामान्य शिपायास दरमहा ३ होन पगार मिळायचा. तर सप्तहजारी सरदारास १,००० होन, आणि एकहजारी सरदारास ५०० होन वार्षिक पगार होता.
गुप्तहेर खाते हे शिवरायांचा “तिसरा डोळा” म्हणून ओळखले जायचे. या खात्याचा पगार आणि तपशील गुप्त ठेवला जात असे. आरमार विभागात सुमारे ४,००० जहाजे होती आणि त्यांचा पगार सागरी व्यापार, जकात आणि खंडणीच्या उत्पन्नातून दिला जात असे.