Chhatrapati Shivaji Maharaj: "अंगात करारी बाणा अन् नजरेत करडी चमक!" राजपूत अधिकाऱ्यानं पाहिलेलं शिवरायांचं तेजस्वी रुप

Manish Jadhav

इतिहासातील कुतूहल

छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष कसे दिसायचे? याबद्दल तत्कालीन पिढीपासून आजच्या पिढीपर्यंत सर्वांनाच मोठे कुतूहल आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

आग्रा भेटीचा प्रसंग

पुरंदरच्या तहानंतर 1666 मध्ये महाराज आग्रा येथे औरंगजेबाला भेटायला गेले होते. त्याचवेळी त्यांच्या तेजस्वी रुपाने सर्वांचे लक्ष वेधले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

राजपूत अधिकाऱ्याचे पत्र

महाराजांना आग्र्यात पाहिल्यावर रामसिंगाच्या एका राजपूत अधिकाऱ्याने त्यांचे वर्णन करणारे एक पत्र जयपूरला पाठवले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

'किरकोळ' पण देखणा बांधा

त्या पत्रात अधिकारी लिहितो की, "शिवाजी महाराज दिसण्यात बांध्याने जरी किरकोळ (Slender) वाटत असले, तरी त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आहे."

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

विलक्षण गोरा वर्ण

महाराजांच्या रुपाचे वर्णन करताना तो अधिकारी लिहितो, "महाराज स्वरुपाने विलक्षण गोरे आहेत आणि त्यांचे तेज डोळे दिपवणारे आहे."

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

राजांचे तेज आणि हिम्मत

"त्यांच्याकडे पाहताच कुणालाही असे वाटावे की, हे कोणी सामान्य माणूस नसून प्रत्यक्ष 'राजे'च आहेत. ते अतिशय हिमतीचे व मर्द माणूस दिसतात."

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

इतिहासाचा अनमोल ठेवा

राजपूत अधिकाऱ्याने 'डुंगल' भाषेत लिहिलेले हे पत्र शिवरायांच्या वास्तव रुपाचा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा मानला जातो.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

Chapora Fort | Dainik Gomantak
आणखी बघा