Chhatrapati Shivaji Maharaj: शून्यातून विश्व निर्माण करणारी 'शिव-शक्ती'; वाचा राजा आणि मावळ्यांच्या प्रेमाची अजोड गाथा

Manish Jadhav

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या मावळ्यांवर असलेले प्रेम हे केवळ राजा आणि प्रजा या नात्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते एका कुटुंबासारखे होते. याच प्रेमापोटी मावळे स्वराज्यासाठी बलिदान द्यायला सदैव तयार असत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

'मावळा' म्हणजे आपला सखा

महाराजांनी मावळ्यांना कधीही नोकर मानले नाही. त्यांनी मावळ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला आणि त्यांना 'स्वराज्याचे शिलेदार' म्हणून सन्मान दिला. यामुळेच सामान्य शेतकरी स्वराज्याचा वाघ बनला.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

मावळ्यांच्या रक्ताची किंमत

महाराज नेहमी म्हणत, "आपल्या मावळ्यांचे रक्त सांडून मिळवलेले यश आम्हाला नको." त्यांनी प्रत्येक मोहिमेत मावळ्यांचा जीव वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

तानाजी मालुसरेंसाठी काढलेले उद्गार

सिंहगड जिंकला पण तानाजी गेले, हे ऐकताच महाराज व्याकुळ झाले. "गड आला पण सिंह गेला" हे त्यांचे शब्द तानाजींप्रती असलेल्या त्यांच्या गाढ प्रेमाची आणि आदराची साक्ष देतात.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

बाजीप्रभूंच्या बलिदान

पावनखिंडीच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे जोपर्यंत महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचत नाहीत, तोपर्यंत लढत राहिले. बाजींच्या बलिदानाची बातमी ऐकून महाराजांच्या डोळ्यांत पाणी आले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

जखमी मावळ्यांची स्वतः विचारपूस

लढाईनंतर महाराज स्वतः छावणीत जाऊन जखमी मावळ्यांची विचारपूस करत. त्यांच्यावर औषधोपचार व्यवस्थित होत आहेत की नाही, याची ते जातीने खात्री करत असत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणे

एखादा मावळा स्वराज्यासाठी धारातीर्थी पडला, तर महाराज त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडत नसत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी स्वराज्य घेत असे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

मावळ्यांच्या नावावर किल्ले

महाराजांनी किल्ले जिंकल्यानंतर अनेक ठिकाणी आपल्या पराक्रमी मावळ्यांच्या स्मृती जतन केल्या. मावळ्यांच्या निष्ठेमुळेच आज हे किल्ले अभिमानाने उभे आहेत, असे ते मानत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका

महाराजांनी आपल्या मावळ्यांना शिस्त लावली होती की, मोहिमेवर असताना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. सैनिकांकडून जनतेला त्रास होऊ नये, ही त्यांची मावळ्यांप्रती आणि रयतेप्रती असलेली तळमळ होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

Jaigad Fort: विजापूरकरांकडून जिंकला अन् सिद्दीला नमवलं, 400 वर्षांपासून समुद्रावर राज्य करणारा 'जयगड'; शिवबांची सांगतो शौर्यगाथा

आणखी बघा