Chhatrapati Shivaji Maharaj: अठरापगड जातींच्या मावळ्यांमध्ये फुंकली स्वराज्याची ऊर्मी; वाखणण्याजोगं शिवरायांचं टीम बिल्डिंग

Manish Jadhav

दूरदृष्टी आणि स्पष्ट ध्येय

महाराजांकडे केवळ तात्कालिक विजय मिळवण्याची नव्हे, तर परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीतून रयतेला मुक्त करुन 'स्वराज्य' स्थापन करण्याची दूरदृष्टी होती. त्यांचे ध्येय अगदी स्पष्ट होते.

Chhatrapati Shivaji Maharaj

व्यवस्थापन आणि नियोजन कौशल्य

अतिशय मर्यादित संसाधनांमध्ये गड-किल्ल्यांचे चोख व्यवस्थापन, गनिमी काव्याचा अचूक वापर आणि अष्टप्रधान मंडळाची निर्मिती यातून महाराजांचे उत्कृष्ट प्रशासकीय व लष्करी नियोजन दिसून येते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

सलोखा आणि सहकाऱ्यांवर विश्वास

शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र आणून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी भरली. जीवाभावाचे सहकारी तयार करणे आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकणे हा त्यांचा मोठा गुण होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

संकटसमयी धैर्य आणि अचूक निर्णयक्षमता

अफझलखानाचे संकट असो वा आग्र्याहून सुटका, महाराज अत्यंत कठीण प्रसंगातही शांत राहून, डगमगून न जाता वेळेवर अचूक आणि धाडसी निर्णय घेत असत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

रयतेचे कल्याण आणि न्यायप्रियता

महाराज हे केवळ राजे नव्हते, तर ते 'रयतेचे राजे' होते. स्त्रियांचा आदर, शेतकऱ्यांच्या पिकांची काळजी आणि गुन्हेगारांना जात-पात न पाहता कठोर न्याय देण्याची त्यांची वृत्ती आदर्श होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

आधुनिक विचार आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार

परकीय सागरी आक्रमक पोर्तुगीज आणि इंग्रजांना रोखण्यासाठी महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र 'आरमार' उभारले. काळाच्या पाऊलखुणा ओळखून बदल करणे हा त्यांचा आधुनिक गुण होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

नैतिकता आणि उच्च चारित्र्य

शत्रू पक्षातील महिलांचाही मातेसमान सन्मान करणे, युद्धाच्या काळात धार्मिक स्थळांना धक्का न लावणे यांमुळे महाराजांच्या नेतृत्वाला एक नैतिक अधिष्ठान लाभले, ज्यामुळे शत्रूही त्यांचा आदर करायचा.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा