Chhatrapati Shivaji Maharaj: शेतकरी राजा सुखी तर स्वराज्य सुखी! जमीनदारांचा जाच संपवणाऱ्या शिवरायांच्या काळात कशी होती महसूल व्यवस्था?

Manish Jadhav

महसूल व्यवस्था

छत्रपती शिवाजी महाराजांची महसूल व्यवस्था ही अत्यंत शिस्तबद्ध, न्यायप्रिय आणि शेतकऱ्यांच्या हिताची होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

शेतकऱ्यांचे रक्षण

महाराजांनी सक्त ताकीद दिली होती की, लष्कराने किंवा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. शेतकऱ्यांकडून पिकाव्यतिरिक्त कोणताही जास्तीचा कर घेतला जात नसे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

जमिनीची मोजणी

राज्यात अंदाजे महसूल न ठरवता जमिनीची अचूक मोजणी केली जाई. त्यासाठी 'शिवशाही काठी' (मोजमापाची काठी) वापरली जात असे, ज्यामुळे कोणावरही अन्याय होत नसे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

पिकांनुसार कर आकारणी

जमिनीचा पोत आणि पिकांच्या उत्पन्नानुसार कर ठरवला जाई. जर पीक उत्तम आले, तर उत्पन्नाचा ठराविक हिस्सा (साधारण 40%) कर म्हणून घेतला जाई.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

नैसर्गिक आपत्तीत सूट

दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले, तर शेतसारा पूर्णपणे माफ केला जाई. "रयतेचे नुकसान झाल्यास कर वसूल करु नका," असा महाराजांचा आदेश होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

तगाई कर्ज

नव्याने शेती करणाऱ्यांना किंवा बी-बियाणे, बैल जोडी घेण्यासाठी सरकारकडून बिनव्याजी कर्ज (तगाई) दिले जाई. हे कर्ज शेतकरी पीक आल्यावर सोयीनुसार परत करु शकत असत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

जमीनदारांच्या मनमानीला चाप

महाराजांनी मध्यस्थांची (वतनदार, देशपांडे, पाटील) मनमानी संपवली. शेतकरी आपला शेतसारा थेट सरकारी तिजोरीत किंवा नियुक्त अधिकाऱ्यांकडे जमा करत असत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

रोख किंवा धान्य स्वरुपात कर

परिस्थितीनुसार शेतकरी आपला कर धान्याच्या स्वरुपात किंवा रोख रकमेत देऊ शकत असे. हे धान्य स्वराज्याच्या किल्ल्यांवर साठवले जाई, जे युद्धाच्या वेळी कामी येत असे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

पडीक जमीन लागवडीखाली आणणे

जी जमीन पडीक होती, ती लागवडीखाली आणणाऱ्या शेतकऱ्याला सुरुवातीची काही वर्षे करामध्ये विशेष सवलत दिली जाई, जेणेकरुन शेतीचे उत्पन्न वाढेल.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

Goa, Chapora Fort | Dainik Gomantak
आणखी बघा