Sameer Amunekar
१६५८ मध्ये गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख “शहाजीचा पराक्रमी मुलगा” असा करत त्यांच्या वाढत्या सामर्थ्याची दखल घेतली.
१६५७ पासून समुद्रावर स्वराज्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी महाराजांनी आरमार उभारून पोर्तुगीज , इंग्रज व डचांना थेट आव्हान दिले.
फेब्रुवारी १६६५ मध्ये महाराज मालवणहून ८५ गलबते घेऊन आग्वाद व वास्को द गामा समोरून गोव्याच्या समुद्रातून गेले.
शाहिस्तेखानावरील छापा व कुडाळ स्वारीनंतर संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी पोर्तुगीजांनी गोव्यातून महाराजांशी तह करण्याचा प्रयत्न केला.
बारदेश स्वारीनंतर महाराज डिचोली येथे सुमारे १५ दिवस मुक्कामास राहून गोव्याची सामाजिक व राजकीय स्थिती जवळून पाहिली.
एप्रिल १६७५ मध्ये महाराजांनी फोंडा जिंकून स्वराज्यात सामील केला; तसेच साळ नदीच्या मुखाशी बेतुल येथे किल्ला उभारण्याच्या प्रयत्नातून पोर्तुगीज सत्तेला मोठा धक्का दिला.