Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांना 'भारतीय आरमाराचे जनक' मानले जाते.
"ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र" हे सूत्र महाराजांनी ओळखले होते. परकीय आक्रमकांपासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी केवळ जमिनीवरचे किल्ले पुरेसे नाहीत, तर समुद्रावरही नियंत्रण हवे, हे महाराजांनी जाणले होते.
महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि पेन यांसारख्या ठिकाणी स्वतःची गोदी उभारली. त्यांनी परकीयांकडून जहाजे विकत न घेता स्थानिक कारागिरांच्या मदतीने स्वदेशी जहाजे तयार करुन घेतली.
मराठा आरमारात गुराब, गलबत, पाल, मचवा, नांव आणि होडी अशा विविध आकारांची आणि कामांची जहाजे होती. ही जहाजे उथळ पाण्यात आणि खाडीत सहजपणे फिरु शकत असत.
समुद्रात शत्रूवर वचक बसवण्यासाठी महाराजांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि कुलाबा यांसारखे अभेद्य जलदुर्ग बांधले. मालवणचा सिंधुदुर्ग हा त्यांच्या आरमारी दूरदृष्टीचा उत्तम नमुना आहे.
आरमाराचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी अष्टप्रधान मंडळात 'दर्यासारंग' आणि 'मायनाक भंडारी' यांसारख्या अनुभवी दर्यावर्दींना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आणि आरमाराला स्वतंत्र दर्जा दिला.
ब्रिटिश, पोर्तुगीज, डच आणि जंजिऱ्याचा सिद्दी यांसारख्या प्रबळ आरमारी सत्तांना महाराजांच्या मराठा आरमाराने सळो की पळो करुन सोडले होते.
महाराजांनी आरमारात कोकणातील कोळी, भंडारी आणि आगरी यांसारख्या दर्यावर्दी समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतले. त्यांच्या साहसी वृत्तीचा उपयोग स्वराज्याच्या संरक्षणासाठी केला.
आरमारातील खलाशांचे पगार, जहाजांची डागडुजी आणि दारुगोळ्याचा साठा याबाबत महाराजांनी अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध नियम लावून दिले होते, ज्यामुळे मराठा आरमार अनेक दशके टिकून राहिले.