औरंगजेबाच्या हातावर तुरी! आग्र्यातून महाराजांची नेमकी कशी झाली सुटका? वाचा धाडसी पराक्रमाची गाथा

Manish Jadhav

आग्रा सुटका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक आणि बुद्धिमत्तेचा कस पाहणारी घटना म्हणजे 1666 साली झालेली त्यांची आग्र्याहून सुटका.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

आग्रा वारी

जयसिंगाच्या मध्यस्थीने आणि दिलेल्या वचनानुसार महाराज 1666 मध्ये पुत्र संभाजीराजांसह आग्र्याला पोहोचले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

महाराजांना राग अनावर

मात्र औरंगजेबाच्या दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या रांगेत उभे करुन अपमानित करण्यात आले. यामुळे चिडलेले महाराज लगेच दरबारातून बाहेर पडले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

औरंगजेबाची कपटनीती

महाराजांच्या या कृतीमुळे औरंगजेबही चिडला. त्याने महाराजांना जयसिंगाच्या निवासस्थानीच नजरकैदेत ठेवले आणि त्यांच्याभोवती कडक पाहरा लावला.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

आजारी पडण्याचे नाटक

महाराजांनी औरंगजेबाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यांनी आजारी पडल्याचे नाटक केले आणि प्रकृती सुधारण्यासाठी दानधर्म करण्याची इच्छा व्यक्त केली.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

संधी साधली

सुरुवातीला सुरक्षा रक्षक या पेट्यांची तपासणी करत होते, पण काही दिवसांनी त्यांना याची सवय झाली आणि त्यांनी तपासणी करणे बंद केले. हीच महाराजांनी संधी साधली.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

धाडसी सुटका

17 ऑगस्ट 1666 रोजी महाराज आणि संभाजीराजे दोन वेगवेगळ्या मिठाईच्या पेट्यांमध्ये बसून किल्ल्याबाहेर पडले. ही सुटका इतकी धाडसी होती की मुघल सैनिकांना थांगपत्ताही लागला नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

वेश बदलून पलायन

किल्ल्याबाहेर पडल्यावर महाराजांनी साधूचा वेश धारण केला आणि संभाजी महाराजांना मथुरा येथे एका विश्वासू ब्राह्मणाच्या घरी ठेवले. तिथून त्यांनी वेगाने दक्षिणेकडे प्रवास सुरु केला.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

महाराज सुखरुप परतले

सुमारे 25 दिवसांच्या प्रवासानंतर महाराज स्वराज्यात सुखरुप परतले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

मराठा कीर्ती वाढली

आग्र्याहून सुटकेच्या या पराक्रमाने शिवाजी महाराजांचे धैर्य, चातुर्य आणि दूरदृष्टी सिद्ध झाली. यामुळे मराठा साम्राज्याची कीर्ती सर्वदूर पसरली आणि स्वराज्याच्या निर्मितीला आणखी बळ मिळाले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

Lohagad Fort: सह्याद्रीच्या कुशीतला 'विंचूकाटा' किल्ला! शिवकालीन सामर्थ्याचं प्रतीक

आणखी बघा