Manish Jadhav
अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. महाप्रतापी संभाजी राजांच्या पराक्रमाची कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महारांजाचे पुत्र छत्रपती संभाजी महारांजाच्या पराक्रमाची गाथा प्रत्येकाने वाचली पाहिजे. त्यांनी अनेक मोहीमा राबवल्या. या मोहिमांपैकी एक गोव्याची मोहीम यादगार ठरली.
आज (11 फेब्रुवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज संघर्षांबद्दल जाणून घेणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मुघल सम्राट औरंगजेब मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला.
औरंगजेब मराठा साम्राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी पोर्तुगीजांची मदत घेणार हे छत्रपती संभाजी महाराजांनी पहिल्यांदाच हेरलं होतं.
सैन्याची कमतरता भासल्यानंतर औरंगजेबाला पोर्तुगीजांनी मदत केली, यावरुन चिडलेल्या संभाजी महाराजांनी स्वतःच गोव्यावर चाल करुन जाण्याचे ठरवले.
पोर्तुगीजांच्या आगळीकीचा बदला म्हणून मराठ्यांनी गोव्यातील अनेक गावे लुटली आणि जाळली, लहान मध्यम आकाराच्या बोटी ताब्यात घेतल्या. एवढच नाहीतर 1682 मध्ये दोन पोर्तुगीज पादऱ्यांना तुरुंगात डांबले.
गव्हर्नरला गोव्याच्या बाहेर काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा बेत संभाजी राजांनी आखला. गोव्याजवळील फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी राजांनी पोर्तुगीजांना याच किल्ल्यावर येण्यास भाग पाडलं.
संभाजी राजांनी फोंडा किल्ल्यावर 5 कोटींचा खजिना असल्याची अफवा पसरवली. ही खबर पोर्तुगीज गव्हर्नरला मिळताच त्याने फोंडा किल्ल्यावर आक्रमण केलं.
मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात चार दिवस संघर्ष चालला. संभाजी राजांनी अचानक धडक देऊन पोर्तुगीजांची दाणादाण उडवली. या संघर्षात मराठ्यांनी बाजी मारली. फोड्यांचे किल्लेदार यसाजी कंक होते.