Pramod Yadav
छत्रपती संभाजी महाराज कोकण दौऱ्यावर असताना त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे पोर्तुगीज आणि मोगलांचे कोकण जिंकण्याचे स्वप्न दोन महिन्यात धुळीस मिळाले होते.
पोर्तुगीज व्हाईसरॉयने संभाजी महाराजांच्या राज्यातील असंतुष्ट वतनदरांना फितवून उत्तर कुडाळ आणि मिरज याभागाचे दोन तुकडे करुन वाटप करण्याचे ठरवले.
शक्य तेवढ्या सर्व वतनदारांना सोबत घेऊन संभाजी राजांना घेण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केला. पण, संभाजी राजांनी माघार घेतली नाही.
महाराजांनी पोर्तुगीजांची कोंडी सुरुच ठेवली आणि डिसेंबर १६८३ पहिल्या आठवड्यात मडगाव, कुंकळ्ळी, कोलवाळ आणि शापोरा किल्ले जिंकून घेतले.
मराठ्यांनी सासष्टी आणि बार्देश तालुक्यातील महत्वाच्या वास्तु ताब्यात घेत लुटल्या आणि उद्धवस्त केल्या. तोफा, दारुगोळा ताब्यात घेतला.
दुसरीकडे मोगलसेना कोकणाच्या जवळ येत असल्याचे कळताच महाराजांनी पोर्तुगीजांसोबत तहाची बोलणी सुरु केली. मोगल डिचोलीत पोहोचले खरे पण तिथून माघारी गेले.
या प्रवासात मोगलांचे अनेक सैन्य मृत्युमुखी पडले. त्यांच्यापर्यंत समुद्रमार्गे पोहोचणारी मदत मराठा सौन्यांनी लुटली. तसेच, कोणतीच रसद पोहोचणार नाही याची काळजी घेतली.
सैन्य उपाशी मरु लागल्याने मौगल फौज रामघाटमार्गे परत जाऊ लागली. कसाबसा शहजादा मुअज्जम औरंगाबाद येथे पोहोचला. जाताना त्याने उपद्रव केला.
पण नोव्हेंबर १६८३ ते जानेवारी १६८४ या कालावधीत संभाजी महाराजांनी कुशल नेतृत्व, धाडसी निर्णयामुळे पोर्तुगीज आणि मोगलांचे कोकण जिंकण्याचे स्वप्न चक्काचूर झाले.