Akshata Chhatre
विकी कौशल याचा नवीन चित्रपट छावा सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. या चित्रपटावर विकीची पत्नी कतरीना हिने देखील प्रतिक्रिया दिलीये.
विकीची पत्नी कतरीना छावा या चित्रपट विकीचा अभिनय पाहून मंत्रमुग्ध झालीये.
सोशल मीडियावर पोस्ट करत तिने विकी कौशल तसेच सगळ्या टीमचे तोंड भरून कौतुक केले आहे.
कतरीना म्हणते कि, छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट पाहणं एक पर्वणीच आहे. खास करून लक्ष्मण उतेकर यांनी दिगदर्शित केलेल्या या चित्रपटाची शेवटची ४० मिनिटं डोळ्यात पाणी आणणारी आहेत.
हा चित्रपट दोनवेळा पहिल्याचं सुद्धा कतरीना सांगते. विकी कौशलचं तिने तोंड भरून कौतुक केलं आहे. विकीची ऍक्टिंग शब्दांत मांडणं कठीण असल्याचं ती म्हणते.
विकीने या चित्रपटात केलेल्या मेहनतीबद्दल ती खूपच खुश आहे आणि त्याच्यावर आणि त्याच्या कामावर कायम अभिमानच वाटेल असं ती सांगते.
शेवटी तिने निर्मात्यांचं आणि संपूर्ण छावा टीमचं कौतुक केलंय. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सर्वजण कतरिनाची रिऍक्शन पाहण्यासाठी आतुर होते.