गोमन्तक डिजिटल टीम
चवथ आणि चविष्ट खाद्यपदार्थ
गोव्यात गणेशोत्सवला खूप महत्व आहे. राज्यात 'चवथ' म्हणून लोकप्रिय असलेल्या या उत्सवाला चविष्ट खाद्यपदार्थ केले जातात.
गोवा सरकारचा 'चवथ ई-बाजार' उपक्रम
गोवा सरकारने गणेश चतुर्थीच्या आधी 'चवथ ई-बाजार' हा डिजिटल मंच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चवथ ई-बाजार
चवथ ई-बाजार हा उपक्रम ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहांना त्यांच्या खाद्यपदार्थ व हस्तशिल्प व पूजेची साहित्य या उत्पादनांची विक्री ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
अॅपद्वारे विक्री
चवथ ई-बाजारासाठी अॅप विकसित करण्यात आला आहे. ज्या महिलांना त्यांचे खाद्यपदार्थांची विक्री करायची आहे त्यांनी जवळच्या दुकानात जाऊन ओळखपत्र आणि बँक खात्याची माहिती देऊन नोंदणी केला नंतर कोड प्राप्त होईल.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक पाऊल
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहांच्या महिलांना त्यांच्या उत्पादनांचे विपणन करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागणार आहे.
चवथ ई-बाजार कालावधी
हा ई-बाजार 18 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
गणेश चतुर्थी खाद्यपदार्थ
गणेश चतुर्थीच्या सणात ग्रामीण भागातील विविध खाद्यपदार्थांची मोठी मागणी असते. चवथ ई-बाजारामुळे मोदक, नेवरी, लाडू, काप, चकली, पापड, फरसाण, मसाले, लोणचे हे विकत घेऊ शकतो.
गेल्या वर्षाच्या यशाची पुनरावृत्ती
2023 मध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चवथ ई-बाजाराची सुरुवात केली होती, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा देखील या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा अंदाज आहे.