Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना 'शिस्त' आणि 'न्याय' या दोन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले. स्वराज्याशी गद्दारी करणारा व्यक्ती कितीही जवळचा असला, तरी महाराजांनी त्याला कधीही माफी दिली नाही.
महाराजांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच एक मोठा संदेश दिला. रांझ्याच्या पाटलाने एका स्त्रीची अब्रू लुटली होती. तो स्वकीय असूनही महाराजांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय तोडण्याची (चौरंगा करण्याची) कठोर शिक्षा दिली. यातून स्वराज्यात स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च आहे, हे सिद्ध झाले.
अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी खंडोजी खोपडे याने स्वराज्याशी फितुरी करुन खानाला साथ दिली होती. युद्धानंतर महाराजांनी गद्दारीबद्दल खंडोजीचा एक हात आणि एक पाय कलम करण्याची कडक शिक्षा सुनावली.
बाजी घोरपडे यांनी महाराजांचे वडील शहाजी राजांना दगाबाजीने कैद केले होते. स्वराज्याशी आणि पित्याशी केलेल्या या प्रतारणेबद्दल महाराजांनी मुधोळवर स्वारी करुन बाजी घोरपडे यांचा रणांगणात वध केला.
जावळीचे चंद्रराव मोरे हे स्वकीय असूनही आदिलशाहीशी एकनिष्ठ होते आणि स्वराज्याला विरोध करत होते. महाराजांनी त्यांना अनेकदा समजावले, पण जेव्हा त्यांनी उद्धटपणा केला, तेव्हा महाराजांनी जावळीवर हल्ला करुन मोऱ्यांचे राज्य आणि वर्चस्व संपवून टाकले.
स्वराज्यातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने जरी फितुरीचा विचार केला, तरी महाराज गय करत नसत. स्वराज्याची गुपिते शत्रूला मिळतील अशा संशयावरुन त्यांनी कठोर लष्करी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
स्वराज्यातील कोणताही देशमुख किंवा वतनदार जर शत्रूला सामील झाला किंवा रयतेवर अन्याय करु लागला, तर महाराज त्याचे वतन आणि जहागीर तातडीने जप्त करत असत. आर्थिक नाड्या आवळून गद्दारांना नामोहरम करणे हे महाराजांचे तंत्र होते.
महाराजांचे मेहुणे बजाजी निंबाळकर यांनी आदिलशाहीची चाकरी केली होती. सुरुवातीला महाराजांनी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.