Manish Jadhav
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या दैनंदिन जीवनाची घडीच विस्कटून गेली आहे.
लेट नाईट काम करत बसणे, सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे आपल्या झोपेवर देखील परिणाम होतो.
आज (10 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून रात्री उशिरा झोपेमुळे होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घेणार आहोत.
रात्री उशिरा झोपल्याने मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. उशिरा झोपल्यामुळे ताणतणाव व नैराश्य यांसारख्या समस्यादेखील उद्भवतात.
योग्य झोप न मिळाल्याने राग, चीडचीड आणि तणाव यांसारख्या समस्यांचा त्रास होऊ लागतात.
रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. त्यामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य नष्ट होते.
योग्य झोप न मिळाल्याने दिवसभर थकवा जाणवतो. झोपेच्या कमतरतेमुळे वजनही वेगाने वाढू लागते.