Manish Jadhav
जेवणानंतर अनेकांना काहीतरी गोड खावेसे वाटते. असे वाटणे योगायोग नाही तर शरीराच्या आणि मनाच्या एका विशिष्ट गरजेचा आणि सवयीचा एक भाग मानला जातो.
आजकालच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
जंक फूडच्या अतिसेवनामुळे तुम्हाला लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या समस्या उद्भवतात.
जर तुम्हाला पण जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल तर सावधान...
दररोज जेवणानंतर गोड खाल्ल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
तसेच, जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे शरीर पोषण शोषून घेत नाही, ज्यामुळे शरीराला कमी प्रमाणात उर्जा मिळते.