Akshata Chhatre
महिला असो वा पुरुष, प्रत्येकजण चमकदार त्वचेसाठी महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्सवर हजारो रुपये खर्च करतो.
मात्र, अनेकदा हे केमिकलयुक्त प्रोडक्ट्स त्वचेला फायदा देण्याऐवजी नुकसान करतात.
त्वचेच्या समस्या अनेकदा शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. म्हणूनच, बाह्य उपचारांपेक्षा अंतर्गत पोषण महत्त्वाचे आहे.
आहारतज्ज्ञांच्या मते, ब्लूबेरी, अक्रोड, द्राक्षे आणि संत्री यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश केल्यास त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
बेरीमधील अँटी-ऑक्सिडंट्स सुरकुत्या कमी करतात, तर अक्रोडमधील ओमेगा-३ फॅटी ॲसिड त्वचेला ओलावा प्रदान करते.
संत्र्यातील व्हिटॅमिन सी मुळे त्वचा ग्लोइंग होते आणि टॅनिंगची समस्या दूर होते.
त्यामुळे पैसे वाचवा आणि निरोगी आहारातून मिळवा 'नॅचरल ब्युटी'!