'या' कारणामुळे आई-वडीलांनी दिल सोडून, आता मिळाली सरकारी नोकरी

दैनिक गोमन्तक

पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (PSPCL) ने अमृतसरचे जुळे भाऊ सोहना आणि मोहना यांच्यापैकी सोहनाला नोकरी दिली आहे, जे जन्मापासून शरीराशी जोडलेले आहेत. ऑल इंडिया पिंगलवाडा चॅरिटेबल सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी कर्नल (निवृत्त) दर्शन सिंग बाबा यांनी याची माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले की, जुळ्या मुलांना 27 नोव्हेंबरला एक पत्र मिळाले होते. बांधवांना त्यांची शैक्षणिक पात्रता आणि आधारकार्ड सारखी कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. कर्नल बाबा म्हणाले की, कोणता भाऊ काम करेल असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला आहे. दोघांनाही रोजगार मिळावा, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही प्रशिक्षण घेऊन इलेक्ट्रॉनिक डिप्लोमाधारक आहेत. सोहना आणि मोहना यांना 2003 मध्ये पिंगलवाड्याने दत्तक घेतले होते जेव्हा त्यांच्या पालकांनी मुलांना सोडून दिले होते.

दोन्ही भाऊ फार काळ जिवंत राहणार नाहीत, अशी भीती डॉक्टरांना वाटत होती

जन्मापासूनच सयामी जुळे असल्याने हे फार काळ जिवंत राहणार नाही, अशी भीती डॉक्टरांना होती. गरिबीमुळे त्याच्या आई-वडिलांनीही त्यांना सोडून दिले. त्यानंतर ऑल इंडिया पिंगलवाडा चॅरिटेबल सोसायटीने पालनपोषण केले. तर आता पंजाब (Punjab) स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी मिळाल्यानंतर ते स्वतःची देखभाल स्वतः करू शकतील.

नियमित टी मॅट (देखभाल कर्मचारी) म्हणून काम करेल

दोघेही दंत महाविद्यालयाजवळील पॉवर प्लांटमध्ये नियमित टी मॅट (देखभाल कर्मचारी) म्हणून काम करतील. त्यांना 11 डिसेंबर 2021 रोजी नियुक्ती पत्र देण्यात आले.

दरमहा 20 हजार रुपये पगार मिळेल

मिळालेल्या माहितीनुसार, सोहनाला दरमहा 20 हजार रुपये पगार मिळणार आहे. दोघांनी यावर्षी जुलैमध्ये इलेक्ट्रिकल डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांनी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी अर्ज केला होता. दोघांचीही पात्रता सारखीच असल्याने काम कोणाला द्यायचे, असा पेच कंपनीसमोर होता. अंतिम निर्णय घेत कंपनी व्यवस्थापनाने सोहनाला कामावर घेतले. माजी मुख्यमंत्री (CM) कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amarinder Singh) यांनी नोकरी देण्याचे आश्वासन दिल्याचे सोहना यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.