Chanderi Fort: 600 वीरांगनांचा अग्निप्रवेश, गुन्हेगारांचा यमलोक अन् खूनी दरवाजा; वाचा 5000 वर्षांच्या संघर्षाची साक्ष देणारा इतिहास

Manish Jadhav

चंदेरी किल्ला

मध्यप्रदेशातील चंदेरी किल्ला हा केवळ एक वास्तू नसून तो भारतीय इतिहासातील अनेक रक्तरंजित आणि अभिमानास्पद घटनांचा साक्षीदार आहे.

Chanderi Fort | Dainik Gomantak

'खूनी दरवाजा'

किल्ल्याचा मुख्य दरवाजा 'खूनी दरवाजा' म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की, प्राचीन काळी गुन्हेगारांना या दरवाजाच्या वरच्या भागातून खाली फेकून फाशी दिली जायची. या दरवाजाच्या भिंती आजही त्या भीषण काळाची साक्ष देतात.

Chanderi Fort | Dainik Gomantak

600 वीरांगनांचा स्वाभिमान!

1528 मध्ये जेव्हा मुघल सम्राट बाबरने चंदेरीवर आक्रमण केले, तेव्हा पराभव समोर पाहून आपल्या अस्मितेसाठी किल्ल्यातील सुमारे 600 राजपूत महिलांनी एकत्र 'जौहर' (अग्निप्रवेश) केला होता. या जागेवर आजही 'जौहर स्मारक' उभे आहे.

Chanderi Fort | Dainik Gomantak

एका रात्रीत बनवलेला रस्ता!

किल्ल्याच्या दक्षिण-पश्चिमेला 'कटी घाटी' नावाचा एक विशाल दरवाजा आहे. हा दरवाजा कोणत्याही सांध्याशिवाय एकाच अखंड पाषाणाला कापून बनवला आहे. असे म्हटले जाते की, हा रस्ता तयार करण्याचे आव्हान एका कारागिराने केवळ एका रात्रीत पूर्ण केले होते.

Chanderi Fort | Dainik Gomantak

बेतवा नदीचे विलोभनीय रुप!

चंदेरी किल्ला समुद्रसपाटीपासून 71 मीटर उंचीवर एका टेकडीवर स्थित आहे. या किल्ल्याच्या तटबंदीवरुन खाली पाहिल्यास बेतवा नदी आणि चंदेरी शहराचे अतिशय सुंदर दृश्य दिसते, जे पर्यटकांना भुरळ घालते.

Chanderi Fort | Dainik Gomantak

अनोखा संगम!

किल्ल्याच्या आत 'नौखंडा महाल', 'हवा पौर' आणि प्राचीन मशिदी आहेत. बारीक कोरीवकाम आणि विशाल घुमट या किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतात. इथल्या वास्तूंवर दोन्ही संस्कृतींचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो.

Chanderi Fort | Dainik Gomantak

जगप्रसिद्ध 'चंदेरी साड्या'

चंदेरी हे शहर केवळ किल्ल्यासाठीच नाही, तर तिथल्या हस्तविणकाम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या परिसरातील निसर्ग आणि तिथल्या ऐतिहासिक वैभवाचा प्रभाव या साड्यांच्या नाजूक डिझाईन्सवर आजही दिसून येतो.

Chanderi Fort | Dainik Gomantak

Belapur Fort: नवी मुंबईचा 'रॉयल' वारसा अन् चिमाजी अप्पांचा 'तो' ऐतिहासिक विजय... 500 वर्षांचा बेलापूर किल्ल्याचा धगधगता इतिहास

आणखी बघा