Manish Jadhav
मध्यप्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यात, बेतवा नदीच्या जवळ एका उंच टेकडीवर हा विशाल किल्ला वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे 711 फूट आहे.
या किल्ल्याची मूळ बांधणी 11व्या शतकात प्रतिहार राजा कीर्तीपाल याने केली होती, म्हणून याला 'कीर्ती दुर्ग' असेही म्हटले जाते.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा 'खूनी दरवाजा' म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की, युद्धाच्या काळात गुन्हेगारांना टेकडीवरुन खाली फेकून शिक्षा दिली जात असे, ज्यामुळे इथली जमीन रक्ताने माखलेली असायची.
1528 मध्ये जेव्हा बाबरने चंदेरीवर आक्रमण केले, तेव्हा राजा मेदिनी राय यांच्या पराभवानंतर किल्ल्यातील 800 हून अधिक राजपूत महिलांनी स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करुन 'जौहर' केले होते. त्याचे स्मारक आजही इथे आहे.
किल्ल्याच्या आत 'नऊखंडा महाल' नावाचे सुंदर ठिकाण आहे. तसेच, इथला 'हवा महल' आपल्या वास्तुकलेसाठी आणि थंडाव्यासाठी पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतो.
चंदेरी किल्ला हा मुघल आणि राजपूत स्थापत्यशैलीचा संगम आहे. किल्ल्यातील कोरीवकाम, कमानी आणि विशाल बुरुज त्या काळातील इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना आहेत
किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले चंदेरी शहर जगभरात आपल्या 'चंदेरी सिल्क' साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या साड्यांना ऐतिहासिक काळात राजघराण्यांकडून मोठे प्रोत्साहन मिळाले होते.
या किल्ल्याचे सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, 'स्त्री' (Stree) आणि 'कलंक' (Kalank) सारख्या अनेक लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण येथे करण्यात आले आहे.