Akshata Chhatre
प्राचीन भारताचे महान तत्त्वज्ञानी चाणक्य यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी काही गोष्टी गुप्त ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
तुम्ही किती कमावता, कुठे गुंतवणूक करता या गोष्टी फक्त स्वतःपुरत्या ठेवा. इतरांचा हेवा किंवा गैरफायदा टाळा.
उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत त्याची माहिती इतरांना देणे टाळा. सुरुवातीलाच चर्चा केल्याने यशात अडथळे येऊ शकतात.
घरातील वाद किंवा अडचणी बाहेर सांगणे टाळा. लोक त्याचा अपप्रयोग करू शकतात.
स्वतःच्या अपयशांबद्दल किंवा दुर्बलतेबद्दल इतरांना सांगू नका. काही लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात.
तुम्ही केलेले दान किंवा मदत गुप्त ठेवा. त्याचं प्रदर्शन केल्यास त्याची शुद्धता कमी होते.