Sameer Amunekar
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत 2023 वनडे वर्ल्ड कप फायनलिस्ट टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहे.
उपांत्य फेरी सामन्यात टीम इंडियाच्या 5 शिलेदारांची कामगिरी ही विजय निश्चित करु शकते. या 5 खेळाडूंमध्ये दमदार कामगिरी करुन सामन्याचा निकाल आपल्या बाजूने फिरवण्याची ताकद आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माकडून अद्याप चांगली कामगिरी करता आली नाहीय, मात्र त्याने दमदार फलंदाजी केली तर भारत सामना एकतर्फी जिंकू शकतो.
स्टार फलंदाज विराट कोहलीनं चॅम्पियन्स ट्रॉफी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यानं पाकिस्तानविरूध्द शतक ठोकलं होतं. त्यामुळे विराटच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. विराटची बॅट चालली तर कांगारुंचं काही खरं नाही.
श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपली छोप सोडली होती. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना त्यानं निर्णायक खेळी केली. श्रेयस मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज आहे. त्यामुळे श्रेयसकडून मिडल ऑर्डरमध्ये चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक 5 विकेट्स घेत टीम इंडियाचा विजय सोपा केला. त्यामुळे वरुणला संधी मिळाल्यास त्याची कांगारुंविरुद्धची कामगिरी ही निर्णायक ठरेल.
हार्दिक पंड्याकडून बॅटिंग आणि बॉलिंगद्वारे उल्लेखनीय कामगिरी अपेक्षित असणार आहे. हार्दिकने अनेकदा टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली आहे.