Sameer Amunekar
पाकिस्तानविरुद्ध १०० धावांची नाबाद शतकी खेळी करून विराट कोहलीने आपला फॉर्म परत मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही त्याने ८४ धावा केल्या.
विराटने या स्पर्धेत आतापर्यंत अनेक विक्रम मोडले आहेत. आता विराट कोहली अंतिम सामन्यात ३ मोठे विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने ७९१ धावा केल्या आहेत. विराट कोहली ७४६ धावा करून दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ४६ धावा केल्या तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. गांगुलीने १३ सामन्यांमध्ये १२ झेल घेतले आहेत. विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने या सामन्यात १ झेल घेतला तर तो दादाच्या विक्रमाशी बरोबरी करेल. दोन झेल पकडताच तो दादाचा विक्रम मोडेल.
सचिन तेंडुलकर हा न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ३२ सामन्यांमध्ये १६५६ धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी विराटला फक्त ९५ धावांची आवश्यकता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विराट कोहली हे ३ मोठे विक्रम मोडू शकतो. या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल.