Sameer Amunekar
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सर्वात मोठा सामना म्हणजेच अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
जर सामना कोणत्याही कारणास्तव रद्द झाला तर कोणता संघ चॅम्पियन होईल? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय.
अंतिम सामन्यासाठी देखील राखीव दिवस आहे. म्हणजेच जर हा सामना 9 मार्च रोजी पूर्ण झाला नाही तर हा सामना 10 मार्च रोजी देखील खेळवला जाईल.
पण नियोजित तारखेला खेळ पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जर हे शक्य नसेल, तर राखीव दिवशी सामना जिथं थांबवला होता तिथून सुरु होईल.
दुसरीकडे, उपांत्य फेरीतील नियम असा होता की जर सामना रद्द झाला तर गटातील अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. पण हे अंतिम सामन्यात दिसणार नाही.
जर पावसामुळं किंवा इतर कोणत्याही कारणामुळं अंतिम सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता केलं जाईल.