Manish Jadhav
गेल्या काही वर्षांत अगदी कमी वयाच्या मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसतेय.
मोठ्यांसह लहान मुलांमध्येही लठ्ठपणाची समस्या वाढत असल्याचे चिंता वाढली आहे.
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
वाढत्या लठ्ठपणामुळे लहान मुलांमध्ये मधुमेहापासून आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
गेल्या काही वर्षात मुलांमध्ये मोबाईलचा वापर कमालीचा वाढला आहे. यामुळे मुलांची शारीरिक हालचाल होत नाही आणि वजन वाढते.
मोबाईलच्य वापराबरोबर मुले मोठ्याप्रमाणावर जंक फूडचे सेवन करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स जमा होऊन शरीरातील चरबी वाढते.
लठ्ठपणामुळे मुलांमध्ये हार्मोनल असंतुलनासारखी समस्या देखील दिसून येत आहेत.
ताण आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्य समस्या देखील लठ्ठपणाला चालना देऊ शकतात.