कॅथरीन झेटा-जोन्सचा 'इफ्फी'च्या रेड कार्पेटवर कूल लूक...

Akshay Nirmale

पतीचा गौरव

हॉलीवूड अभिनेते मायकल डग्लस यांना यंदा गोव्यातील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

Catherine Zeta-Jones | Instagram

लक्षवेधी लूक

या पुरस्कार सोहळ्यासाठी डग्लस यांची पत्नी हॉलीवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा-जोन्स देखील उपस्थित होती. समारोप सोहळ्यात तसेच रेड कार्पेटवर कॅथरीन यांनीही लक्ष वेधून घेतले.

Catherine Zeta-Jones | Instagram

आवडते हिंदी चित्रपट

यावेळी कॅथरीन यांनी द लंचबॉक्स हा आवडता चित्रपट असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या मुलांना ओम शांती ओम हा चित्रपट आवडत असल्याचे सांगितले.

Catherine Zeta-Jones | Instagram

विमान प्रवासात पाहिली फिल्म

लंच बॉक्स चित्रपट कॅथरीन यांनी विमान प्रवासात चक्क दोन वेळा पाहिला होता, असेही त्यांनी सांगितले.

Catherine Zeta-Jones | Instagram

दिग्दर्शकाची भेट

लंचबॉक्स चित्रपट पाहिल्यानंतर मी माझ्या एजंटकडे दिग्दर्शकला भेटण्याबाबत विचारणा केली. नंतर रितेश बत्रा यांची कॅथरीन यांनी भेटही घेतली.

Catherine Zeta-Jones | Instagram

रेड कार्पेटवर

कॅथरीन यांनी इफ्फीमध्ये दोन वेळा रेड कार्पेटवर एंट्री घेतली होती. एकदा त्या मायकल डग्लस यांच्यासोबत इफ्फीमध्ये आल्या तेव्हा आणि त्यानंतर समारोपावेळी.

Catherine Zeta-Jones | Instagram

मुलासोबत फोटो

पहिल्या रेड कार्पेट एंट्रीवेळी कॅथरीन यांनी फिक्कट निळा वन शोल्डर गाऊन परिधान केला होता. त्यांनी मुलगा डिलन डल्गससोबत पाप्पाराझींना पोझेसही दिल्या.

Catherine Zeta-Jones | Instagram
What is Deep Fake content? | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...