Sameer Panditrao
आता थंडी पुन्हा चांगल्या प्रकारे पडू लागली आहे. बागायती, काजू, व आंब्याच्या उत्पादनासाठी ही थंडी पोषक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
मागील काही वर्षांपासून काजू पिकामध्ये सातत्याने घट होत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती.
चांगल्या पावसामुळे आणि पोषक वातावरणामुळे काजू तसेच आंब्याच्या झाडांना चांगला मोहोर आला आहे. बागायतदारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
सतत हवामान बदल आणि तापमानातील फरकामुळे आंबा व काजू पिकांच्या मोहोरावर परिणाम होतो. उष्णतेमुळे टी मॉस्किटो व मॅंगो हॅपर कीड पसरते, ज्यामुळे मोहोर काळवंडतो.
जर मोहोरावर मोठ्या प्रमाणात दव राहिले तर त्याचा पिकावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
गोवा वेधशाळेनुसार, पुढील ४८ तासांत तापमान कमाल ३३°C आणि किमान २१°C राहण्याची शक्यता आहे. रात्री व पहाटे धुके आणि दव पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
उष्णता आणि थंडी यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन गोवा वेधशाळेने केले आहे.