Sameer Panditrao
मागील चार वर्षांपासून राज्यातील काजू उत्पादनात सातत्यानं घट होत आहे. परंतु यंदा वातावरणाने बागायतदारांची आशा वाढली आहे.
यंदा चांगला पाऊस, थंडी आणि पोषक वातावरणामुळे काजू आणि आंब्यांच्या झाडांमध्ये चांगला मोहर आहे. यामुळे बागायतदारांना आशा आहे की, पिकं चांगली येतील.
काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होत आहे. उष्मा आणि धुके यामुळे काजू आणि आंबा पिकाचा मोहर करपण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
सतत हवामान बदल घडल्यास आणि तापमानात १५ अंश सेल्सिअसचा फरक पडल्यास काजू आणि आंबा पिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
तापमान वाढल्यास काजूसाठी टी मॉस्किटो आणि मॅंगो हॅपर कीडीचा प्रादुर्भाव होतो.
बागायतदारांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण योग्य काळजी न घेतल्यास काजू आणि आंबा पिक खराब होऊ शकते.
बागायतदारांना आशा आहे की वातावरण पोषक राहिलं तर दोन्ही पिकं चांगली येऊन त्यांना चांगले पैसे मिळतील. त्याच वेळी उष्मा, धुके आणि दव यामुळे चिंता देखील आहे.