Sameer Panditrao
३१ डिसेंबरच्या रात्री गोव्याला एक वेगळाच उत्साह चढलेला होता. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशभरातून पर्यटक गोव्यात दाखल झाले होते.
बीचवर प्रचंड गर्दी होती. लोक समुद्राच्या लाटांमध्ये खेळत होते, नाचत होते आणि उत्सव साजरा करत होते.
शॅक्स भरले होते. खाण्या-पिण्याचा मनसोक्त आस्वाद घेत, लोक नवीन वर्षाचे जल्लोषाने स्वागत करत होते.
गोव्याचे रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. प्रत्येक ठिकाणी वाहनांची वर्दळ आणि लोकांचा उत्साह पाहायला मिळत होता.
गोव्याचा कोपरान कोपरा प्रकाश आणि सजावटीने उजळलेला दिसत होता.
फॅमिली आणि मित्रपरिवाराने एकत्र येऊन आनंद लुटला.
गोव्यातील किनाऱ्यांवरची आतिषबाजी तर प्रसिद्ध. त्यासाठी किनाऱ्यांवर लोक जमले होते.