गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यामध्ये आपणास अनेक वास्तू पाहायला मिळतील ज्यांची रचना आणि इतिहास इथल्या संस्कृतीच्या समृद्धतेची ओळख करून देईल.
अल्वारिस कुटुंबाच्या मालकीचा हा वाडा साधारणपणे २५० वर्षे जुना आहे.
हा वाडा पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील ग्रामीण भागाच्या जीवनाचा पुनःनिर्माण करण्यासाठी उभारले गेलेले जुने पर्यटन संकुल आहे.
ही भव्य वास्तू प्रशस्त अंगणात बांधली गेली आहे आणि आसपास सुंदर बगिचा आहे.
या हवेलीत तुम्हाला अनेक युरोपियन वस्तू आणि जुन्या फोटोंचा संग्रह पाहायला मिळेल.
इथल्या कार्यालयात गुप्त ड्रॉवर्स आणि कोनाड्यांसह एक खास टेबल आहे. सोबत स्मोकिंग पाइपचाही संग्रह पाहायला मिळतो.
इथल्या प्रार्थना कक्षात अनेक गणेश मूर्ती आणि येशूच्या फोटोंचा संग्रह आहे.
इथे ध्वनी आणि प्रकाश शोची व्यवस्था आहे ज्यामुळे तुम्ही इथल्या प्रत्येक दालनाची माहिती घेऊ शकता.
हे ठिकाण शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे, इथे अनेक प्रसिद्ध चित्रपटांची चित्रीकरणे झालेली आहेत.
गोव्यातील १७ व्या शतकातील 'ही' भव्य वस्तू तुम्ही पाहिली आहे का?