Hair Oiling Tips: केसांचे सौंदर्य टिकवायचेय? मग 'या' 8 चुका टाळाच

दैनिक गोमन्तक डिजिटल

खूप जास्त वेळ तेल लावून ठेवणे

अनेक जण रात्रभर किंवा २-३ दिवस केसात तेल तसंच ठेवतात. यामुळे टाळूवर (scalp) धूळ आणि घाण जमा होते, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळू लागतात.

Scalp Health Care | Dainik Gomantak

अतिप्रमाणात तेल वापरणे

जास्त तेल लावल्याने केस जास्त सुंदर होत नाहीत. उलट, ते तेल धुण्यासाठी जास्त शॅम्पू वापरावा लागतो, ज्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो.

Scalp Health Care | Dainik Gomantak

जोरजोरात मसाज करणे

तेल लावताना हाताची नखे लागतील असे किंवा खूप जोरात चोळून मसाज करू नका. यामुळे केसांची मुळे सैल होतात आणि केस तुटण्याचे प्रमाण वाढते. नेहमी हलक्या हाताने मसाज करावा.

Scalp Health Care | Dainik Gomantak

तेल लावल्यानंतर लगेच केस विंचरणे

तेल लावल्यानंतर केसांची मुळे खूप नाजूक आणि मऊ झालेली असतात. अशा वेळी लगेच कंगवा फिरवल्यास केस मोठ्या प्रमाणात तुटतात. तेल लावण्यापूर्वीच केस विंचरून घ्यावेत.

Scalp Health Care | Dainik Gomantak

खूप गरम तेल लावणे

कोमट तेल केसांसाठी उत्तम असते, पण जर तेल जास्त गरम करून लावले, तर त्यामुळे टाळूची त्वचा भाजू शकते आणि केसांचे कायमचे नुकसान होऊ शकते.

Scalp Health Care | Dainik Gomantak

गलिच्छ किंवा न धुतलेल्या केसांवर तेल लावणे

जर केसांमध्ये आधीच धूळ, घाम किंवा कोंडा असेल आणि त्यावरच तुम्ही तेल लावले, तर केसांची छिद्रे (pores) बंद होतात. यामुळे खाज सुटणे आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

Scalp Health Care | Dainik Gomantak

केस घट्ट बांधून ठेवणे

तेल लावल्यानंतर लगेच केसांना घट्ट वेणी घालणे किंवा अंबाडा बांधणे टाळावे. तेल लावल्यामुळे आधीच संवेदनशील झालेली केसांची मुळे घट्ट बांधल्याने लगेच तुटतात.

Scalp Health Care | Dainik Gomantak

केसांच्या लांबीकडे दुर्लक्ष करणे

अनेक जण तेल फक्त टाळूला (स्कॅल्प) लावतात आणि केसांच्या टोकांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे केस दुभंगणे (split ends) आणि कोरडे पडण्याची समस्या निर्माण होते. म्हणून मुळांपासून टोकांपर्यंत तेल लावावे.

Scalp Health Care | Dainik Gomantak

'या' 8 भन्नाट टिप्स वाढवतील नात्यातील गोडवा

Healthy Relationship | Dainik Gomantak
आणखी बघा