Manish Jadhav
वर्षाच्या पहिल्याच दिवशी कार कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. आजपासून कार खरेदी करणे महाग झाले आहे. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कार कंपन्यांनी वाढवलेल्या किमतीवर एक नजर जरुर टाका.
ज्या कंपन्यांनी कारच्या किमती वाढवल्या आहेत त्यामध्ये मारुती, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन, एमजी आणि निसान यांचा समावेश आहे.
महिंद्राने 1 जानेवारी 2025 पासून म्हणजेच आजपासून भारतातील त्यांच्या संपूर्ण पोर्टफोलिओच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवल्या आहेत. तुम्ही आज किंवा आज नंतर केव्हाही महिंद्रा कार खरेदी केली तर ती गेल्या वर्षीच्या तुलनेत महाग पडेल.
तुम्ही आता मारुती सुझुकीची कार खरेदी केली तर ती 4 टक्के महाग पडेल. इतर वाहन कंपन्यांप्रमाणेच कंपनीनेही डिसेंबरमध्ये दर वाढवण्याचा निर्णय घेतला.
आजपासून मर्सिडीज बेंझ कंपनीच्या सर्व कारच्या किमतीत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने 2024 मध्येच याबाबत इशारा दिला होता.
ऑडी इंडियानेही कारच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कंपनीचे सुमारे 16 मॉडेल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
BMW ने डिसेंबर 2024 मध्येच सांगितले होते की, ते 2025 च्या सुरुवातीला वाहनांच्या किमती वाढवतील. कंपनीने नवीन वर्षात कारच्या किमतीत तीन टक्क्यांनी वाढ केली.
Hyundai ने आजपासून आपल्या सर्व कारच्या किमती 25 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. तुम्ही Hyundai चे कोणतेही मॉडेल विकत घेतल्यास, तुम्हाला ते वाढीव किमतीतच मिळेल.
टाटा मोटर्स हॅचबॅक आणि एसयूव्ही सेगमेंटसह तिचे सर्व मॉडेल्स विकते. टाटाही नवीन वर्षापासून आपल्या वाहनांच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवत आहे.