Manish Jadhav
कारमध्ये बसल्यानंतर सर्वप्रथम सीट बेल्ट लावावा. चालक आणि सहप्रवासी दोघांनीही सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे.
कार चालवताना मोबाईलवर बोलणे, मेसेज टाइप करणे किंवा सोशल मीडिया वापरणे हे अपघाताला आमंत्रण देऊ शकते. गरज असल्यास ‘हँड्स-फ्री’ सुविधा वापरा किंवा गाडी थांबवूनच मोबाईल वापरा.
प्रत्येक रस्त्याला ठराविक वेग मर्यादा असते. ती पाळल्यास अपघाताचा धोका कमी होतो आणि इंधनाची बचतही होते.
ट्रॅफिक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंग बोर्ड्स यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
रात्री किंवा धुक्याच्या वेळी चालवताना हेडलाईट्स वापरा. आरसे स्वच्छ ठेवा आणि व्हायपरची कार्यक्षमता तपासा.
मद्यपान केल्यानंतर गाडी चालवणे कायद्याने गुन्हा असून जीवघेणेदेखील ठरु शकते.