Manish Jadhav
स्वयंपाकघरांमध्ये हिरव्या मिरच्यांचा वापर केवळ तिखटपणा वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील केला जातो.
हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि लोह यासारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
हिरव्या मिरच्यांमध्ये असलेले कॅप्सेसिन नावाचे घटक चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन जलद कमी होण्यास मदत होते.
हिरव्या मिरच्यांमध्ये असलेले कॅप्सेसिन रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
हिरव्या मिरच्या हृदयरोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत करतात.
हिरव्या मिरच्यांचे नियमित सेवन केल्यास दृष्टी सुधारते.