Akshata Chhatre
तुम्हाला रात्री झोपेचा खूप त्रास होतोय का? दिवसभर काम करून थकायला होतं आणि झोप लागली नाही की चिडचिड होते.
रात्री झोपण्याआधी १० मिनिटे खोल श्वास घ्या आणि सोडा. यामुळे मन शांत होतं आणि झोप लवकर लागते.
रोज काही वेळ डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा, यामुळे मनातले विचार कमी होतात आणि झोप चांगली लागते.
रोज १५–२० मिनिटांची योगनिद्रा करा. हे शरीर झोपेसारखं रिलॅक्स करतं आणि मन शांत करतं.
रात्री झोपण्याआधी सौम्य संगीत, निसर्गध्वनी किंवा वाद्यसंगीत ऐका. हे मनाला शांत करतं आणि झोपेसाठी योग्य वातावरण तयार करतं.
झोपण्याआधी गरम दूध प्यायल्याने झोप लवकर लागते. दुधातील ट्रिप्टोफॅन नावाचा घटक मेंदू शांत करतो.