Sameer Panditrao
गोव्यातील अप्रतिम असे हे काबो दी रामा बीच आहे.
काबो दी रामा परिसर तिथला शांत समुद्र आणि आसपासचे इतर स्त्रोतांमुळे पोहण्यासाठी नावाजला जात आहे.
इथल्या निळ्याशार पाण्यात डुबकी मारा आणि रंगीबेरंगी सागरी जीवनाचा अनुभव घ्या.
नदी आणि समुद्र यांच्या संगमावर कयाकिंगचा अनोखा अनुभव घ्या, निसर्गाच्या सान्निध्यात रममाण व्हा.
स्थानिक मच्छीमारांसोबत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून तुमच्या कौशल्याची चाचणी घ्या.
किनाऱ्यावर विसावा घ्या, कोवळ्या उन्हाचा आनंद घ्या आणि समुद्राच्या लाटांचे संगीत ऐका.
अविस्मरणीय अनुभव
साहस, शांतता आणि निसर्गसौंदर्याचा मिलाफ असलेला हा परिसर नक्कीच भेट देण्यासारखा आहे!